Ad will apear here
Next
रेखा साठ्ये अनुवादित ‘सीतायन’- पुस्तक प्रकाशन - अद्भुत, अलौकिक, अतृप्त महाकाव्य

‘सीतायन’- पुस्तक प्रकाशन

अद्भुत, अलौकिक, अतृप्त महाकाव्य

दिनांक १५ एप्रिल २०२३ रोजी पीवायसी जिमखाना येथे पार पडलेल्या बुकगंगा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशित आणि रेखा साठ्ये अनुवादित सीतायन या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या विदुषी, डॉ. सुचेता परांजपे यांच्या हस्ते झाले.

जसे रामायण हा रामाचा जीवनप्रवास आहे, तसेच सीतायन हा सीतेचा जीवनप्रवास आहे. सीतेविषयी इतके दीर्घ लिखाण इतर कोणत्याच पुस्तकात नाही जे सीतायन मध्ये आहे. सीतेच्या जन्मापासून- तिचे बालपण, तिचे तारुण्य, तिचे वैवाहिक जीवन, तिचा वनवास, तिच्या जीवनातील प्रत्येक घटना या पुस्तकात रेखाटल्या आहेत, असे मत विदुषी, डॉ. सुचेता परांजपे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

सोबत अनुवादिका रेखा साठ्ये, बुकगंगा.कॉमचे संस्थापक मंदार जोगळेकर, संचालिका सुप्रिया लिमये आणि गौरी जोशी उपस्थित होत्या.

के. आर. श्रीनिवास अयंगार यांनी मूळ इंग्रजी भाषेत लिहिलेले ‘सीतायनम्’ हे पुस्तक वाचून मी सीता या व्यक्तिमत्त्वाने भारावून गेले आणि माझ्या हातून अनुवाद होत गेला, याचा मला खूप आनंद आहे. अशा भावना रेखा साठ्ये यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या. सोबतच राणी पारसनीस, सुप्रिया केळवकर आणि डॉ. आरती दातार यांनी पुस्तकातील काही भागांचे अभिवाचन करून कार्यक्रमाला अधिकच रंगत आणली आणि त्याला डॉ. वर्षा भिडे यांच्या गीतांची सुरेल सोबत होती. मंदार जोगळेकर यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा शेवट अमोल साठ्ये आणि रेश्मा साठ्ये यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

बुकगंगा.कॉम वरून ‘सीतायन’ याचे प्रिंट पुस्तक आणि ई-बुक विकत घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा-

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZVTDV
Similar Posts
बुकगंगा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशित आणि पद्माकर पाठकजी लिखित ‘सुनहरे गीत’ या पुस्तकाचे प्रकाशन गाणी ऐकण्याच्या छंदाला अभ्यासाचे रूप देणे आणि त्यावर पुस्तक लिहिणे हे विशेष आहे...
लेखिका स्मिता यांचे मूळ इंग्रजी पुस्तक Face IT चे बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे यांनी प्रकाशित केलेले आणि शुभदा विद्वंस यांनी भाषांतरित केलेले मराठी पुस्तक प्रकाशन सोहळा... लेखिका स्मिता यांचे मूळ इंग्रजी पुस्तक Face IT चे बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे यांच्यातर्फे मराठी भाषांतर प्रकाशित...
बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित आणि डॉ. माधवी वैद्य लिखित ‘कवी शब्दांचे ईश्वर.. असे साकारले कवी’ या पुस्तकाचे प्रकाशन मुखवटे नसणार्‍या चेहर्‍यांपर्यंत पोहोचणे अवघड : कवी-गीतकार वैभव जोशी यांचे प्रतिपादन... डॉ. माधवी वैद्य लिखित ‘कवी शब्दांचे ईश्वर.. असे साकारले कवी’ या पुस्तकाचे प्रकाशन... हे पुस्तक अभ्यासकांसाठी ऐतिहासिक दस्तावेज : डॉ. पी. डी. पाटील
अनुवाद क्षेत्राचे भवितव्य ‘एकेकाळी उपेक्षित असलेला ‘अनुवाद’ हा साहित्यप्रकार आज लोकप्रिय आणि आघाडीला आहे. जग एक ‘ग्लोबल व्हिलेज’ झाल्यानंतर आणि फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप यांसारखी माध्यमे विलक्षण वेगाने वापरात येत असताना ते अपरिहार्य आहे. त्यामुळे ‘अनुवादाचे भवितव्य काय,’ याचे उत्तर ‘अनुवादालाच भवितव्य’ असे द्यावे लागेल....’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language